वंचित बहुजन आघाडीची अमळनेर येथे झाली बैठक संपन्न

अमळनेर: आज दिनांक 3 जुलै सोमवार रोजी ढेकु रोड विश्राम गृह येथे जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी इंगळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रभारी रविकांत वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत चर्चा करण्यात आली की
दिनांक 18जुलै रोजी जळगांव जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या महापुरुषांच्या विटंबना,दलीत, मुस्लिम, तरुणी व महिला बघीनी यांच्यावर होणारा वाढत्या अत्याचारा विरोधात इन्साफ मोर्चा (न्यायासाठीचा मोर्चा) काढण्यात येणार आहे. सदरील मोर्चाच्या प्रमुख मागण्या १. महाराष्ट्र राज्य अत्याचारग्रस्त राज्य घोषित करावे. २. दलीत मुस्लिम व महिला भगिणिवर होणारा अन्याय व अत्याचार विरोधात प्रतिबंध कायदा तयार करावा. अश्या दोन प्रमुख मागण्याच्या संदर्भाने मोर्चा काढण्यात येत आहे. तरी सदरील मोर्चात जास्तीत जास्त सर्व समाज बांधव, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर बैठकीस दाजिबा गव्हाणे तालुकाध्यक्ष ,संदीप सैदाणे शहर अध्यक्ष ,गुलाब बाबा कोळी-युवा तालुकाध्यक्ष ,दिनेश बीर्हाडे संपर्क प्रमुख भिमराव वानखेडे, तालुका सचिव अमजद पठाण, विनोद बिर्हाडे नाना सैदाणे,पुनमचंद निकम,अरुण पाटील, असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

[democracy id="1"]