नगरपरिषदेची राखा थोडीतरी शान,गमवू नका जनतेची जान, इंजि. साहेब देसले त्वरित रस्ता करा छान
अमळनेर: येथील न्यु अशोकदादा भालेराव नगरात ऐन पावसाळ्यात जागे झालेल्या ठेकेदाराने नगरपालिकेच्या तोंडात बोळा कोंबून मनमानी भुयारी गटार काम सुरू केले असून संबंधित अधिकारी डोळे मिटून ससेहोलपट कां करीत आहेत?
अहो इंजिनिअर साहेब आणि वरिष्ठ अधिकारी साहेब तुमच्या घरापुढील दैनंदिन वापराच्या रस्त्यावर अशी तुमच्या परिवारास नरकयातना तुमच्याच बुध्दीजीवी विचाराने भोगल्या तर तुम्हाला काय वाटले असते? याचा विचार करून जनतेला लाखोंली वाहण्यासाठी परावृत्त करू नका.ते सुध्दा कोणाचे म्हातारे आई वडील, तसेच बालगोपाल मुले, बाळं आहेत याची तरी जाणिव ठेवा.आणि त्यामुळे होणारे त्रास मुळे लोकांचेवाईट शब्दरूपी आशिर्वाद घेऊन या कामासाठी पापचे वाटेकरी होऊ नका.अशी या भागातील लोकांची अपेक्षा आहे तरी अशा बोगस अवेळी काम करून जनतेला वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराची मनमानी भुयारी कां? तसेच ठेकेदारांच्या स्वार्थासाठी जनतेला यातनामय प्रसंग आणणे कामी नगर परिषदेच्या जबाबदार व्यक्ती मुगगिळून आंधळे कां? असा लाजिरवाणा प्रश्न जनतेला पडत आहे.जसे चांगले रस्ते फोडून, भुयारी गटार सोहळा मान्यवरांचे संमतीने खड्ड्यात पावसाचे पाणी मुरत आहे तसेच कुठेतरी दुसरे पाणी मुरत असेल का? असे सर्व सामान्य माणसाला प्रश्न निर्माण झाले आहेत.असो.ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो देव.तरी त्वरित दखल घेऊन रस्त्यावर योग्य ती दुरुस्ती करून जनतेच्या अंतःकरणाचे चांगले आशिर्वाद घ्यावे असे बहुतांश लोकांना वाटते.