अमळनेर:श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर अमळनेर येथे सामाजिक न्याय दिवस हा राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनासह होतकरू,गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग ,शालेय गणवेश,वहया पुस्तक वाटप करून साजरा करण्यात आला.
‘छ.शाहू महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक समता निर्माण केली.’असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केले.”स्वतःच्या आचरणातून सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे राजर्षि शाहू महाराज हे कर्ते समाजसुधारक होते.असे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले.प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान शेलार हे उपस्थित होते.
याप्रसंगी सरस्वती विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश,स्कूल बॅग,वह्या पुस्तकं संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी निवड झाल्यानिमित्त अशोक पाटील यांचा सर्व शिक्षक वृंद,व विद्यार्थी प्रतिनिधीच्याहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सहृदय सत्कार करण्यात आला.यावेळी उपशिक्षक आनंदा पाटील, सौ संगीता पाटील, सौ. गीतांजली पाटील, ऋषिकेश महाळपूरकर, धर्मा धनगर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. तर सौ पूनम पाटील, सागर भावसार, किरण पाटील, दिग्दविजय पाटील हे याप्रसंगी उपस्थित होते.