राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मारवड महाविद्यालयात साजरी

अमळनेर: मारवड येथील नानाभाऊ मंसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पूजन करून अभिवादन केले.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सतीश पारधी हे होते.यांनी शाहू महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी शाहू महाराजांची जयंती हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जात असून त्यांचा कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते,शेवटी कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल प्रा. विजय पाटील यांनी मानले.

[democracy id="1"]