डॉ. माणिक बागले यांना राष्ट्रीय शिक्षारत्न पुरस्कार

पारोळा (प्रतिनिधी: रियल इंडो ग्लोबल व्हीजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल संस्था,धुळे यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षारत्न पुरस्कार २०२३ हा किसान महाविद्यालय,पारोळा येथील मराठी विभाग प्रमुख व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मराठी अभ्यास मंडळ सदस्य डॉ. माणिक माधव बागले यांना राष्ट्रीय शिक्षारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. संशोधन,सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नूतन मारतह महाविद्यालय,जळगाव सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय शिक्षारत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मनोहर पाटील अध्यक्षस्थानी होते. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. टी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कर प्रदान करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. दिलीप रामु पाटील विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे,स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ,नांदेड येथील प्रा. डॉ. सूर्यकांत थोरात गुरुकुल फाउंडेशनचे अध्यक्षप्रा. डॉ. संभाजी पाटील प्रा डॉ.मोहन पावरा प्राचार्य डॉ. देशमुख प्राचार्य डॉ. प्रमोद पवार प्राचार्य डॉ. महेंद्र सूर्यवंशी प्राचार्य डॉ.आर. एस. पाटील प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे डॉ.वासुदेव वले आदी उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे, अध्यक्ष तथा बाजार समिती पारोळा सभापती व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील उपप्राचार्य डॉ. गुणवंत सोनवणे सहकारी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन व कौतुक केले.

[democracy id="1"]