भारतीय इतिहासातील लखलखते पान म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा दिन – डी..धनगर

अमळनेर: अखंड हिंदुस्थानात अनेक गड किल्ले जिंकून स्वराज्य निर्माण करणारा रयतेचा कैवारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. रयतेचे राज्य होते पण रयतेला राजा नव्हता म्हणून 6 जून 1674 रोजी रायगडावर रयतेचा राजा सिंहासनारुड झाला. प्रत्येकाच्या मनावर नवचैतन्याचा फवारा उडाला. त्याच दिवशी भारताचा इतिहास हा सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला असे प्रतिपादन श्री दत्त सार्वजनिक वाचनालय आयोजित कार्यक्रमात डी ए धनगर यांनी केले.
श्री दत्त सार्वजनिक वाचनालय शिरूड ता अमळनेर येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन श्रीदत्त सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केले होते. यावेळी जानवे येथील वाचनालयाचे अध्यक्ष प्रा श्री डी एम पाटील, मुख्याध्यापक व्हि ए पाटील यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला. तसेच डी ए धनगर यांची ग्रंथालयावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री दत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच गोविंदा सोनवणे होते.
भालेराव पाटील, जयवंतराव पाटील, काळू पाटील, पांडुरंग पाटील, पोलिस पाटील विश्वास महाजन, भाऊराव पाटील, आनंदराव पाटील, संभाजी पाटील, गुलाबराव पाटील, दगाजी पाटील, नवल बैसाणे, न्हानू पाटील, प्रल्हाद भाऊसाहेब, बळीराम धनगर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला. सत्कारमूर्तींनी मनोगते व्यक्त केली.

[democracy id="1"]