श्री सुनील नंदवाळकर साहेब यांची उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) म्हणून अमळनेर येथे पदोन्नती

अमळनेर: फागणेकर श्री आबासो. सुनील दिगंबरशेठ नंदवाळकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अमळनेर येथे पदोन्नती झाली त्याबद्दल समाजातील सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
अत्यंत शांत, संयमी तसेच शिस्तप्रिय अशी ओळख असलेले व अतिशय कठीण परिस्थितीत आपले उच्च शिक्षण पुणे येथून घेऊन आपल्या स्वबळावर पोलीस विभागात १९९० मध्ये खडतर असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली येथून पोलीस उपनिरीक्षक म्हणून आपली सेवा प्रारंभ केली.

त्यांनी आतापर्यंत पोलीस विभागात विविध उच्च पदावर गडचिरोली, जळगाव, चोपडा, औरंगाबाद, नाशिक, पालघर, नंदुरबार अशा विविध ठिकाणी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडून कार्याचा ठसा कायम ठेवला आहे. तसेच त्यांनी राज्यात गाजलेल्या तेलगी तपासात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे

श्री सन्मानिय सुनिल नंदवाळकर साहेब यांना घरातूनच अध्यात्मिक तसेच सामाजिक, वारसा, लाभलेला आहे. वडील स्वर्गीय दिगंबर नाना हे धुळे जिल्हा परिषद सदस्य देखील होते त्यामुळे राजकीय, सामाजिक वारसा देखील लाभलेला आहे. आज आपल्या संपूर्ण बडगुजर समाजातून दोन भाऊ DYSP म्हणून कार्यरत असल्याने अभिमानाची बाब आहे. लहान भाऊ श्री. बापुसो अनिल दिगंबर बडगुजर हे धुळे येथे अँटीकरप्शन विभागात डीवायएसपी म्हणून कार्यरत आहे. मोठे बंधू दादासो राजेंद्र नंदवाळकर हे उपकार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त आहे तसेच आण्णासो श्री संजय बडगुजर हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त असून लहान भाऊ श्री श्यामभाऊ बडगुजर हे भाजपा तालुकाध्यक्ष म्हणून वडिलांचा राजकीय वारसा जिद्दीने सांभाळत आहेत लहान बहीण ताईसाहेब सौ. शीतल संभाजीशेठ बडगुजर या देखील उच्च विद्याविभूषित आहेत.
????????अमळनेर नगरित सन्माननीय श्री सुनिल नंदवाळकर साहेबांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन व पुढील भावी कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा ????????
???? स्वागत व शुभेच्छुक ????
जगन्नाथ बडगुजर (जेष्ठ पत्रकार) मुख्य संपादक-साप्ताहिक अटकाव हितेंद्र बडगुजर संपादक- अटकाव न्युज अंमळनेर

[democracy id="1"]