आज होणार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची निवड

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती  सभापती पदाची माळ आज कोणाच्या गळ्यात पडणार…

अमळनेर :कृषी उत्पन्न बाजार समितीची आज दि.१६ मे रोजी सभापतीची निवड होणार असून सभापतीपदाची वर्णी कोणाची लागते याकडे जनतेचे लक्ष आहे सभापती महाविकास आघाडीचा होणार हे निश्चित असले तरीही खुर्ची वर वर्णी ही नेमकी कोणाची लागणाऱ या याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. सभापतीपद आपल्याला मिळावे म्हणून इच्छूकांनी मुंबई दौरे केले असून सभापती निवडीच्या वेळेस कोणताही धोका होऊ नये याकडे महाविकास आघाडीचे सर्व नेते लक्ष ठेवून आहेत.
अमळनेर बाजार समितीचा सभापती होण्याचा मान कुणाला मिळतो वर्णी कोणाची लागते ह्या कडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. बाजार समितीचे नवनिर्वाचित ११ सभासद मुंबई ला नेत्यांच्या भेटी गाठीसाठी गेले होते. तिथ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब ,खासदार सुप्रियाताईं सूळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांची भेट घेतली असून आज दि.१६/०५/२३रोजी महाविकास आघाडी सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार व वर्णी कोणाची लागणार याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे

[democracy id="1"]