अमळनेर :जात प्रमाणपत्राच्या प्रलंबित मागणीसाठी व अन्य विविध मागण्यांसाठी अमळनेर येथे प्रांत अधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि.८ मे २०२३ या तारखेपासून कोळी समाज बांधवाचे अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे या सत्याग्रहात समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.
अनेक वर्षापासून कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्रासाठी व विविध मागण्यांसाठी शासन दरबारी झगडावे लागत आहे, यासाठी चोपडा तालुक्यातील महर्षी वाल्मिक समाज मंडळाचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी चोपडा व अमळनेर तालुक्यातील असंख्य कोळी समाज बांधवांसोबत अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे.
मागण्या पुढील प्रमाणे
विविध मागण्यांमध्ये चोपडा विधानसभा मतदारसंघसह अमळनेर तालुक्यातील ज्या कोळी समाज बांधवांचे जात प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागाकडे अर्ज प्रलंबित असतील त्यांना तात्काळ टोकरे कोळी एस टीचे दाखले द्यावेत.
२.यावल येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत येणारी कोळी समाजाचे गावे व त्या व्यतिरिक्त ज्या गावात ठक्कर बाप्पा योजना व शबरी घरकुल योजना राबवली असेल अशा गावातील कोळी लोकांना टोकरे कोळी चे दाखले द्यावे.
३.ज्यांची ग्रामपंचायत कुटुंब पत्रकात अनु. जमाती नोंद आहे, अश्या कोळी बांधवांना महा राजस्व अभियानांतर्गत एस टीचे दाखले द्यावे,
४) महसूल विभागाच्या ७अ व/७/१२ खाते उताऱ्यावर ज्यांची आदिवासी कोळी ३६ व ३६अ ची नोंद झाली असेल त्यांना एस टी चा दाखला द्यावा अशा मागण्यांसाठी हा सत्याग्रह सुरू आहे. बुधवारी चोपड्याहून कोळी समाज युवा कार्यकर्ता शुभम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कोळी बांधवांनी बाईक रॅली काढून अमळनेर येथील उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.तसेच अमळनेर कोळी महासंघ व कोळी समाज पंच मंडळाचे पदाधिकारी यांचे सत्याग्रह स्थळी वेळोवेळी सहकार्य लाभत आहे.
काल तिसऱ्या दिवशी उपोषण स्थळी भेट देणारे अमळनेर विधानसभा आमदार अनिल पाटील, विधान परिषद सदस्य आमदार रमेश पाटील (मुंबई) माजी विधान परिषद सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा स्मिताताई वाघ, माजी शिक्षक आमदार प्रा. दिलीप सोनवणे ,जीवनलाल चौधरी( न.प गटनेता चोपडा( माजी जि. प समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, अमळनेर माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर ,ॲड गणेश सोनटक्के, शुभम सोनवणे,
कोळी समाजाचे नेते बाळासाहेब सैंदाणे, मुकेश कुमार सोनवणे, मोहन शंकपाळ ,धुळे कोळी समाजाचे नेते प्रदीप नवसारे, वसंत जाधव, देविदास नवसारे, अरुण वाघ, भाऊराव बागुल, नामदेव येडवे (शिंदखेडा) तसेच तालुका सह जिल्हा व जिल्हा बाहेरील समाज बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.