लोक माझे सांगाती राजकीय आत्मचरित्राचे प्रकाशन संपन्न..

अमळनेर:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मंगळवारी झाले. प्रकाशनानंतर शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पक्षाध्यक्षपद आपण सोडणार आहोत… पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या समितीने पुढचा अध्यक्ष निवडावा, अशी सूचना पवार यांनी उपस्थित नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासमक्ष केली आणि सभागृहात हलकल्लोळच झाला. या सगळ्यांनी पवार यांना गराडाच घातला. पक्षाध्यक्षपद सोडण्याचा विचार सोडून द्या… तुमच्याशिवाय कुणीही पक्षाध्यक्ष नको, असे आर्जव ते करीत होते. अनेक नेत्यांना अश्रूही अनावर झाले होते. त्या परिस्थितीत पवार यांना तेथून हलणेही कठीण झाले. अखेर ज्येष्ठ नेत्यांनी साऱ्यांची कशीबशी समजूत काढली व पवार यांना तेथून निघता आले. तरीही, असंख्य कार्यकर्ते चव्हाण प्रतिष्ठानच्या बाहेर संध्याकाळपर्यंत ठिय्या मारून बसले होते.

[democracy id="1"]