मारवड (ता.अमळनेर ) दि.२ (वार्ताहर ) मारवड (ता अमळनेर) येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय पाटील यांना त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याची दखल घेऊन नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम पुरस्कृत गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर्फे दिला जाणारा “महाराष्ट्र विद्यारत्न पुरस्कार” मान्यवरांच्या हस्ते एस.एन.डी.टी. वुमेन्स युनिव्हर्सिटी संलग्नित, रुक्मिणीताई कला ,वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, अमळनेरच्या राष्ट्रीय चर्चासत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण प्रसंगी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे .शेख माजी प्राचार्य डॉ. मधुकर शिंदे उपप्राचार्य डॉ. श्याम पवार तसेच मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांच्यासह चर्चासत्रात सहभागी महाविद्यालयीन प्राध्यापक बंधू -भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
प्रा. डॉ. संजय पाटील हे मारवड महाविद्यालयात विगत 23 वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ते पीएच-डी .चे मार्गदर्शकही आहेत.त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शोधपत्रांचे सादरीकरण केले असून महाविद्यालयीन व विद्यापीठस्थरिय विविध जबाबदाऱ्याही पार पाडलेल्या आहेत.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून नुकताच महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला . त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष देविदास साळुंखे, संस्थेचे सचिव देविदास बारकू पाटील तसेच सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.