शाळांच्या धर्तीवर अंगणवाडी केंद्रानाही उन्हाळी सुट्टी जाहीर करा-
रामकृष्ण पाटील यांची मागणी

रामकृष्ण पाटील यांची मागणी.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना

अमळनेर: सद्या राज्यभर उन्हाची तीव्रता वाढल्याने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्याच धर्तीवर अंगणवाडी केंद्रातील लाभार्थींना आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करावी.अशी मागणी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान वाढल्याने सर्वदुर उष्णतेची लाट पसरली आहे. शासनाने प्रतिबंध उपाय म्हणून दि. २१ एप्रिल ते दि. १५ जुन या काळात विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा अंगणवाडीतील बालकांचा वयोगट कमी असतो परिणामी त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते म्हणून इतर शाळांप्रमाणे अंगणवाडी केंद्रांनाही त्यांच्या धर्तीवर वरील कालावधीत सुट्टी जाहीर करावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन २०२१ मध्ये कोरोना काळात उन्हाळी सुट्टी देण्यात आली नाही तसेच २०२२ मध्येही फक्त आठच दिवस उन्हाळी सुट्टी देण्यात आली होती.
मागिल शिल्लक असलेली उन्हाळी सुट्टी अधिक चालू वर्षाची सुट्टी मिळण्यास अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका पात्र आहेत.
त्यामुळे दि. १ मे ते १५ जुनपर्यंत शिल्लक सुट्टींचा समावेश करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी.सुट्टीच्या काळात लाभार्थींना देण्यात येणाऱ्या आहार कच्च्या स्वरुपात घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशीही मागणी निवेदनाद्वारे आयुक्तालया नवी मुंबई यांच्याकडे केली असल्याची माहिती रामकृष्ण बी.पाटील यांनी दिली आहे.

[democracy id="1"]