संपुर्ण खान्देशात व उत्तर महाराष्ट्रात प्रथमच असा कार्यक्रम
…
अमळनेर: येत्या अक्षय तृतीयेला दि 22 एप्रिल रोजी श्रीमती भानूबेन शहा गोशाळा,पळासदडे रोड,अमळनेर येथे *गोमातेसाठी भव्य 56 भोग कार्यक्रम* आयोजित केला असून,अमळनेरच नव्हे तर संपुर्ण खान्देशात व उत्तर महाराष्ट्रात प्रथमच असा कार्यक्रम होत आहे,अमळनेर शहर व तालुक्यातील गो सेवकांच्या संकल्पनेतुन आणि दानदात्यांच्या योगदानातून हा कार्यक्रम होत आहे. यादिवशी 33 कोटी देवतांचा निवास असलेल्या गोमतेला 56 भोग म्हणजे 56 प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांचा *(मिठाई,पुरणपोळी, द्रायफुट,फळे,भाजीपाला,गूळ, चारा,ढेप यासह अनेक प्रकारचे खाद्य)* भोग गोशाळेत असलेल्या *सुमारे 335 गोमातांना* चढविला जाणार आहे.हा कार्यक्रम निश्चितच सर्वाना मनशांती आणि आनंद देणारा ठरणार असून अविस्मरणीय असा तो क्षण असणार आहे.विशेष म्हणजे जोडीने आलेल्या प्रत्येक दाम्पत्यास गोमतेस भोग लावण्याचा मान दिला जाणार आहे. तरी या चांगल्या व
नाविन्यपूर्ण
अनोख्या कार्यक्रमाचा
लाभ
गोसेवकानी घ्यावा
ही
आग्रही विनंती
श्रीमती भानूबेन बाबूलाल शहा गोशाळा,पळासदडे रोड,अमळनेर यांच्या वतीने करण्यात् आली आहे.
वेळ- दि 22 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत
स्थळ-श्रीमती भानूबेन बाबूलाल शहा गोशाळा,पळासदडे रोड,अमळनेर