तलाठीसह कोतवालास जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली रंगेहात अटक

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या हिस्स्यांची शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजाराची लाच घेतांना लाचखोर तलाठीसह कोतवालास आज जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (वय-५० रा. बोरखेडा ता.चाळीसगाव), कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण (वय-३७ रा. श्रीकृष्ण नगर, चाळीसगाव) असे संशयित आरोपींचे नावे आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील एका शेतकऱ्याच्या नावावर वडीलोपार्जीत शेती आहे. त्यांच्या नावावर असलेले एक शेत पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांनी बोरखेडा येथील तलाठी यांच्याकडे प्रकरण टाकलेले होते. दरम्यान, शेतजमीन पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे याने ७ हजाराची मागणी केली होती. तडजोडी अंती ५ हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, या संदर्भात तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली. तक्रारीची पडताळणीसाठी विभागाने सापळा रचला.
तलाठी ज्ञानेश्वर कोळी यांनी कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण
याच्या मार्फत गुरूवार २३ मार्च रोजी ५ हजाराची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोना ईश्वर धनगर,पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ सचिन चाटे, सफौ दिनेशसिंग पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोनाजनार्दन चौधरी, पोना किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळु मराठे, पोकॉ प्रदिप पोळ,पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ प्रणेश ठाकुर यांनी कारवाई केली.

मार्गदर्शक
1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.