

अमळनेर -दिनांक ८मार्च २०२३-महिला दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेर येथे तर्फे महिला भगिनींचा रोटरी हॉल येथे भव्य असा सत्कार समारंभ करण्यात आला होता. याप्रसंगी अमळनेर शहरात व तालुक्यात ज्या महिलांनी आपल्या जीवनात संघर्ष करून समाजात उल्लेखनीय असे सामाजिक कार्य केलेले आहे व ज्या भगिनींचे जीवन हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल अश्या भगिनींचा सत्कार करण्यात आलेला होता. समाजात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला त्यात समाजसेविका, घटस्फोटीत पीडिता महिला ,गृहिणी, डॉक्टर्स, वकील,राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या आदी जवळ जवळ शंभर महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमात रोटे रोनक संकलेचा याने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने महिलांशी सुसंवाद साधताना त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांनी आपले जीवन कसे संघर्षमय असताना सुद्धा आपण कठीण प्रसंगांना कसे सामोरे गेलं याचे समर्पक उत्तरे देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले व आपल्या दिव्य नारी शक्तीचा त्यांनी परिचय करून दिला.
याप्रसंगी माजी विधान परिषद आमदार सौ स्मिताताई वाघ, एडवोकेट ललिता ताई पाटील, हिंगोणा-दोधवद सरपंच श्रीमती राजश्री पाटील सौ राजश्री पाटील, डॉ. अर्पणा मुठे, डॉ. अंजली चव्हाण, सौ सुषमा पाटील, सौ गोहर शेख, सौ मालू पाटील, सौ दिव्या जीवनानी शिल्पा सिंघवी आदींनी सुसंवादात हिरीरीने सहभाग नोंदविला. याप्रसंगी आमंत्रित सर्व महिला व रोटरी अंनस क्लब सदस्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता. रोटरी क्लब अमळनेर तर्फे प्रेसिडेंट कीर्तीकुमार कोठारी ,सेक्रेटरी ताहा बूकवाला, प्रोजेक्ट डायरेक्टर देवांग शाह,डॉअनिल वाणी, अजय केले,अहमद बुरहानी, सौरभ छाजेड, महेश पाटील ,प्रतीक जैन आदी रोटरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती रोटरी पी आर ओ मकसूद बोहरी व आशिष चौधरी कळवितात.