अमळनेर – प्रताप महाविदयालयात ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून महाविद्यालय व लिनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थीनीचे व्यक्तिमत्व विकास व महिलांच्या आरोग्य समस्या’ या विषयांवर डॉ. मयुरी संदीप जोशी यांचे व्याख्यान झाले. या प्रसंगी डॉ. मयुरी यांनी महिला दिना बद्दल ची माहिती, स्त्री-पुरुष समानता, आरोग्याची निगा व स्वच्छता अशा विविध विषयांवर मॉडेल द्वारे व्याख्यान देऊन विद्यार्थिनींच्या व प्राध्यापिकांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमवेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. डॉ. जे. बी. पटवर्धन, प्रा जयेश गुजराथी, लिनेस क्लब चे सभासद जास्मीन भरूचा, चिटणीस अश्विनी अग्रवाल, शिंदे मॅडम, जोशी मॅडम इ. उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. नलिनी पाटील व आभार प्रदर्शन प्रा. वृषाली वाकडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वैशाली महाजन, प्रा. डॉ. वंदना पाटील, प्रा. पुष्पा पाटील, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा सुचित्रा रत्नपारखी, प्रा. अनिता राजहंस यांनी सहकार्य केले कार्यक्रमासाठी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, खा. शि. मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.