अमळनेरकरांची मानाची सार्वजनिक शिवजयंती मिरवणूक पारंपरिक पध्दतीने हजारो शिवभक्तांच्या प्रचंड जल्लोषात संपन्न.

अमळनेर: अमळनेरकरांची मानाची सार्वजनिक शिवजयंती मिरवणूक पारंपरिक पध्दतीने हातातील भगवे झेंडे, डोक्यावरील फेटे घातलेल्या हजारो शिवभक्तांच्या प्रचंड जल्लोषात मोठ्या थाटामाटात पांचपावली मंदीर ते छ. शिवाजी महाराज नाट्यगृहापर्यंत संपन्न झाली.
हजारोंचा संख्येने शिवभक्तांनी भव्य दिव्य मिरवणूकीने आमळनेकरांचे लक्ष वेधले. सार्वजनिक शिवजयंतीचे मुख्य आकर्षण ठरले राजमुद्रा मुला मुलीँचे ढोल पथक तर टाकरखेडा एस पी गृपचे मुला मुलींचे लाठ्याकाठ्यांची कर्तबगारी लक्षवेधी ठरली. सरस्वती विद्या मंदिर च्या नववारी नेसलेल्या फेटे बांधलेल्या लहान मुलींचे लेझीम पथक , सायर देवी बोहरा स्कुलचे पथनाट्य चौकाचौकात नागरिकांना खिळवून ठेवत होते. घोडेस्वार झालेले मावळे ,चालत्या वाहनवरचा नारी शक्ती इव्हेंट गृपचा शिवजन्मोत्सव देखावा, भारत रक्षक फाउंडेशनचा जिप गाडीवरील भारत मातेचा देखावा , जिजामाता व बाल शिवबा देखावा साकारणारे विवेक पाटील,धनराज पाटील यांच्या सजवलेल्या जिपगाडीहि आकर्षक ठरल्या. पोलीस ग्राउंड येथे उपविभागीय अधिकारी हुलहुळे,तहसीलदार मिलींद वाघ,न प चे प्रशासन अधिकारी प्रशांत सरोदे,संजय चौधरी,ए.पी.आय शिरोडे आदिच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली.मिरवणुकीत राणाजी बँड वाद्यवृंद तरुणाईला शिवगीतांवर जल्लोषात नाचवत होती.
सदर मिरवणूक पवन चौक,तिरंगा चौक , बस स्टँड , महाराणा प्रताप चौक ,प्रबुद्ध विहार, जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे मिरवणूक विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून समारोप छ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिवपूजनाने बालशिवाजी, जिजाऊ यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी
मा.आ.शिरीषदादा चौधरी, पाडळसे धरण समितीचे सुभाष चौधरी व पदाधिकारी, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, अँड तिलोत्तमा पाटील, प्राचार्या मंजुळा नायर, नगरसेवक प्रविण पाठक, मनोज पाटील, गोकुळ पाटील, राजेंद्र यादव,मा.उपनगराध्यक्ष अनिल महाजन यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समारोप प्रसंगी नाट्यमंदीर येथे आलेल्या हजारावर शिवभक्तांना सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे व सौ.शैलजा शिंदे यांच्यावतीने चि. शिवतेज शिंदे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.तर मिरवणुकीत भैय्या महाजन यांच्या कडून थंड पेय वाटप , पाचपावली मंदीर येथे विपूल गारमेंट यांच्या वतीने अल्पोहार , हाॕटेल संजय चे संचालक पवन चौधरी यांच्या कडून लस्सी वाटप , तुषार सोनार यांच्या कडून संपूर्ण मिरवणूकीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर खांदेश रक्षक फाँन्डेशन यांच्या वतीने महाराणा प्रताप चौक येथे शरबत वाटप , जिजाऊ चौक येथे प्रेम पारधी तर्फे अन्नदान ,मंगळ ग्रह मंदिर संस्थान , मा.आ. शिरीष दादा चौधरी , सचिन खंडारे, सचिन कलेक्शन , विनोद लांबोळे , राणाजी बँड , राधे पवार , निखील पाटील , जयेश शिंदे , गिरीष बेहरे,पत्रकार विजय गाढे,पत्रकार प्रविण बैसाणे,पत्रकार नूर खान इत्यादींचे सहकार्य लाभले. सार्वजनिक शिवजयंती उत्सवात आमदार अनिल दादा पाटील , नगर परिषद अमळनेर यांचे सहकार्यासह पोलीस प्रशासनाने सौजन्यशील असा चोख बंदोबस्त ठेवून मोलाचे सहकार्य करीत मिरवणूक वेळेवर नाटयमंदीर येथे पोहचवली म्हणून प्रशासनाचे
व मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानाची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचावतीने मानण्यात आले.अमळनेरकरांची मानाची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सभासद व युवा मित्र परिवाराने अथक परिश्रम घेऊन मिरवणूक यशस्वी केली.

[democracy id="1"]