ग.स.पतपेढीतर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजना अंतर्गत पाच हजार रुपयांचा धनादेश सुलोचना पाटील धनादेश प्रदान.

अमळनेर: येथील पंचायत समितीतील शिक्षण विभागातील कर्मचारी सुलोचनाताई पाटील यांच्या कन्या जान्हवी हिचा विवाह जानवे (ता अमळनेर) येथील मुरलीधर पाटील यांचे चिरंजीव शुभम हिच्याशी झाला. या विवाह निमित्त ग स पतपेढी तर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजना अंतर्गत पाच हजार रुपयांचा धनादेश ‘टीडीएफ’चे कार्याध्यक्ष उमेश काटे यांच्या हस्ते श्रीमती पाटील यांच्याकडे प्रदान करण्यात आला. यावेळी ग.स.पतपेढीचे संचालक तथा गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील, ग स पतपेढीचे शाखा अधिकारी योगेश भरत पाटील, लिपिक सुनील पाटील, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, केंद्रप्रमुख छगन पाटील, उपक्रमशील शिक्षक चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, तुषार पाटील आदी उपस्थित होते.