छत्रपति शिवाजी महाराजांवर ७५ वक्ते ७५ ठिकाणी भाषण करून शिवजयंती पंधरवडा केला जात आहे साजरा..

अमळनेर: रोटरी क्लब व युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचालित , राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ७५ वक्ते ७५ ठिकाणी छत्रपति शिवाजी महाराजांवर भाषण करून शिवजयंती पंधरवडा ( दिनांक १० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२३) साजरा केला जाणार आहे .
वक्त्यांच्या वक्तृत्व कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यशाळा.
*दिनाक १२ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी, सकाळी 09 ते 12 च्या दरम्यान वक्त्यांची *कार्यशाळा* रोटरी हॉल येथे संपन्न झाली .सदर कार्यशाळेत विद्यार्थी वक्त्यांनी 3 (तीन )मिनिट शिवाजी महाराजांच्या जीवनपट व कर्तृत्वावर भाषण केले. यावेळी
प्रोजेक्ट चेअरमन रो.विशाल शर्मा यांनी रोटरी क्लब द्वारे विद्यार्थी ना शिवाजी महाराजांचे चित्र असलेले शालेय पॅड सभाग दर्सविल्या बदल दिले. रोट. किशोर भाई लुल्ला, रो.महेश पाटील व रोटरी अध्यक्ष, सेक्रेटरी रो.कीर्तीकुमार कोठारी, प्रेसिडेंट
रो.तहा बुकवला ,क्लब सेक्रेटरीव सदस्य उपस्थित होते. तसेच प्रो.अशोक पवार सर, प्रा. लीलाधर पाटील, रणजीत शिंदे, मिलिंद पाटील, शिवश्री बाबुराव ठाकरे, प्रेमराज पवार, उमेश काटे,प्रो. शेख सर , डॉ. कुणाल पवार , अशोक पाटील, सुरेश वाडीले, श्रीमती प्रतिभा साबे , नंदलाल तेजी , वाल्मिक मराठे, गुणवंत पवार, विठ्ठल आप्पा, सोपान भवरे, अजय भामरे, संदीप जैन व युवा कल्याण प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी यांनीही सहभाग दर्शविला. कार्यक्रमच्या दरम्यान विद्यार्थ्यांना अल्पहार देण्यात आले. अशी माहिती रोटरीचे पीआरओ आशिष चौधरी यांनी पुरवली.

[democracy id="1"]