अमळनेर दि.०७/०२/२०२३: येथील पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्या आंदोलनात विविध स्तरातील संघटना सहभागी होत असून अमळनेर वकील संघ व अमळनेर संघटना देखील ५१ हजार पत्रलेखन आंदोलनात उतरली आहे
अमळनेरच्या कोर्ट परिसरात वकील संघाची बैठक संपन्न झाली यावेळी वकील संघाचे जेष्ठ वकील अँड अशोक बाविस्कर यांनी पाडळसे धरण हा सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने वकील संघ या आंदोलनात सहभागी होईल असे सांगितले. यावेळी जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी उपस्थित वकिलांना संबोधित केले. सूत्रसंचालन अँडवराकेश बिराडे यांनी केले याप्रसंगी अँड विलास वाणी, अँड के व्ही कुलकर्णी, अँड आर ए निकुंभ,अँड रमाकांत माळी,अँड चंद्रकांत पवार,
अँड किशोर पाटील जन आंदोलन समितीचे कायदेशीर सल्लागार कुंदन साळुंखे, अँड विवेक लाठी,अँड दिनेश पाटील आदी उपस्थित होते
अमळनेर स्टॅम्प वेंडर संघटनेनेही उत्स्फूर्तपणे पत्र लेखन करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाडळसे धरण गति मान्यतेने पूर्ण करण्याचे आवाहन पत्राद्वारे केले असून ९ फेब्रुवारी च्या मिरवणूक आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. यावेळी धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी मार्गदर्शन केले समितीचे हेमंत भांडारकर, रामराव पवार, हिरामण कंखरे सुशील भोईटे,प्रवीण संदांनशिव, प्रसाद चौधरी यांचे सह अमळनेर स्टॅम्प वेंडर संघटनेचे बाबा देशमुख , गोकुळ येवले, दत्ताभाऊ संदानशिव, गणेश येवले, संजय बिऱ्हाडे,प्रशांत पवार ,सतीश वाणी ,शामकांत शिंदे, सुनील पाटील, मधुकर नारळे, दिनेश पानकर,महेश बागुल, संजय साळुंखे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते