अमळनेर (योगेश पाने )- जळगांव जिल्ह्यातील नावाजलेली व आपली आगळी वेगळी ओळख असणारी पतपेढी म्हणजे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीमध्ये होय. या पतपेढीच्या संचालक मंडळासाठी 2023-2027 साठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी आज रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत मतदार राजा मतदान करण्यासाठी गंगाराम सखाराम हायस्कूल अमळनेर या ठिकाणी मतदान करत आहे. आशिया खंडातील सर्वात कमी व्याज दरात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कर्जपुरवठा करणारी व अत्यंत पारदर्शक व्यवहार असणारी ही लोकप्रिय जळगांव जिल्ह्यातील पतपेढी असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पतपेढीच्या संचालक पदासाठी तालुक्यातील अनेक उमेदवार हे रिंगणात असून मतदार राजा पर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील ही निवडणूक चुरशीची होते की एकतर्फी हे मतदार राजाने दिलेल्या आपल्या मतपेटीतील मतदानातून लवकरच समोर येईल.