धुळे कामगार न्यायालयाचा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना उपदान ग्रॅज्युएटी देणे बाबत आज दिनांक 30 .1 .2023 रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला या निकालाची पार्श्वभूमी अशी की श्रीमती विमल झिंगा पाटील शिंदखेडा वगैरे अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी उपदान ग्रॅज्युटी मिळवण्यासाठी संघटनेच्या मार्गदर्शनाने धुळे येथील कामगार न्यायालयात एडवोकेट सुभाष बी पाटील यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिका मध्ये सेवा निवृत्ती अंगणवाडी सेविका मदतनीस निवृत्तीच्या दिनांक पासून दर साल दर शेकडा 10% व्याजाप्रमाणे त्यांच्या निवृत्तीच्या वेळीच्या शेवटच्या मानधनावर व एकूण झालेल्या सेवाकाळानुसार उत्पादनाची रक्कम चार आठवड्याचे आत जिल्हा परिषदेने बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अदा करन्याचे आदेश पारित केलेले आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या संघटनेच्या अथक प्रयत्नाने सदर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना व्याजासह सुमारे एक ते दीड लाख तसेच मदतीसांना एक लाख रुपये पर्यंत उत्पादनाची ग्रॅज्युएटीच्या रकमा प्रशासनाकडून अदा करण्यात येणार आहेत या कामी याचिकाकर्त्यांना माननीय न्यायालयाने महाराष्ट्र शासनाचे सचिव महिला बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी शिंदखेडा एक-दोन यांना या रकमा एक महिन्याच्या आत देण्याची निर्देश दिलेले आहेत सदर सेविका व मदतनीस यांना सदरच्या याचिका ना. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 25 .4 .2022रोजिच्या गुजरात राज्यातील मनी बेन् मगन भाई भारिया विरुध्द जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या प्रकरणी दिलेल्या न्याय निवाडा आधारे दाखल करून त्यांनी सदरचा न्याय निवाडा मे कोर्टाकडून प्राप्त करून त्यांना मोठा दिलासा निवृत्तीनंतर मिळाला आहे . ना. सर्वोच्च न्यायालयाच्या वरील न्याय निवाळ्या नंतर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या बाबतीत प्रथमच महाराष्ट्रात राज्यात निकाल झालेला आहे . त्यामुळे या याचिकाकडे अनेक लोकांचे लक्ष लागून होते. असे संघटनेचे अध्यक्ष मायाताई परमेश्वर कार्याध्यक्ष युवराज बैसाणे रामकृष्ण पाटील सुधीर परमेश्वर दत्ता जगताप अमोल बैसाणे इतर पदाधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवय कळवले आहे तसेच महाराष्ट्रातील पहिला निकाल अंगणवाडी सेविका मदतीस यांच्या बाजूने झाला झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे तसेच संघटनेचेही मोठ्या प्रमाणात राज्यभर कौतुक होत आहे.
युवराज बैसाणे कार्याध्यक्ष. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना.