शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची ऐतिहासिक उसळण निफ्टी 18812 पार
आज सेन्सेक्स आणि निफ्टीनेपुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठला. बाजारात आज दिवसभर तेजी दिसून आली तरी नफावसुलीमुळे काही प्रमाणात ब्रेक लागला. बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 184 अंकांच्या तेजीसह 63,284 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 54 अंकांच्या तेजीसह 18,812 अंकांवर स्थिरावला
बाजारातील व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 13 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 निर्देशांकातील 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 27 कंपन्यांचे शेअर दर घसरले. बँक निफ्टीनेदेखील उच्चांक गाठल्यानंतर नफावसुली दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांकाने आज 43,515.05 अंकांचा उच्चांक गाठला. बाजार बंद झाला तेव्हा बँक निफ्टी निर्देशांक 29.65 अंकांच्या तेजीसह 43,260.65 अंकांवर स्थिरावला.