मतदान कर्तव्यावर कर्मचारी नियुक्ती करताना मा. जिल्हाधिकारी महोदयांनी खालील बाबींचा विचार करावा – शिवश्री.भूषण सोनवणे

हितेंद्र बडगुजर अटकाव न्यूज

अमळनेर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संदर्भात आपल्या  स्तरावरून शिक्षक कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश आलेले आहेत आणि ते सुमारे शंभर -दिडशे किलोमीटरवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या मधून शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? एक तर आपल्यावर त्यांचा विश्वास नाही,असा अर्थ होतो किंवा मग विनाकारण त्रास देणं हाच उद्देश दिसतो. स्थानिक पातळीवर नगरपालिका, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व निवडणुका असतात तेव्हा मात्र अगदी आपल्या गावातच नियुक्ती करण्यात येते, तेव्हा तर आपल्या पैकी बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत असतात, मग आपल्याच गावात आपण आपल्याच लोकांच्या रोषाला सामोरे जात असतो.
लोकसभेच्या निवडणुकीत आपण आपल्याच मतदारसंघात कर्तव्य पालन केले, तेव्हा आपण इडीसी द्वारे मतदान केले, मग आताच असं काय घडतं???
तसेच जे पती-पत्नी शिक्षक/ शिक्षिका आहेत किंवा इतर कार्यालयांमध्ये पती आणि पत्नी शिक्षिका किंवा पती शिक्षक आणि इतर कार्यालयामध्ये पत्नी कार्यरत अशा जोडप्यांची ही खूप मोठी गैरसोय होत असते. दोघेही निवडणुकांच्या कर्तव्यावर असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना सकाळी पाच वाजता पोहोचवण्याचे आणि रात्री अपरात्री परत घरी आणण्याचे काम वाऱ्यावर सोडले जाते. तरी महिला कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरून सोयीच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आपल्या शासकीय स्तरावरून करण्यात यावी कारण घरी मुला-बाळांची, वृद्धांची आबाळ होत असते. म्हणून दोघांच्या नेमणूक न ठेवता फक्त एकालाच जर निवडणूक कार्यासाठी नेमणूक केली तर अशा जोडप्यांना सोयीचे होईल.
काही लोकांना सुदैवाने जवळपास वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर नियुक्ती मिळते. मग जेव्हा या कामाचे मानधन वाटप केले जाते, तेव्हा सर्वांना सारखेच मानधन कसे दिले जाते – म्हणजे आपल्या मुख्यालयापासून वीस किलोमीटर जाणारा आणि दीडशे किलोमीटर जाणारा दोघांनाही सारखेच मानधन कसे काय दिले जाते???
तरी मानधनात वाढ करून योग्य तो न्याय देण्यात यावा

या बाबतीत नक्कीच आवाज उठवला गेला पाहिजे ही कोण्या एकाचीच समस्या नाही, तर सर्वांची सामूहिक समस्या आहे आणि म्हणूनच जबाबदारी सुद्धा सर्वांची आहे.

शिवश्री.भूषण सोनवणे अमळनेर टी.डी.फ संघटना ता. उपाध्यक्ष
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल ता. कार्यअध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]