अमळनेर- बल्हाणे (पिंपळनेर) संस्थापक कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील तथा प पू बंडूबापूजी स्मृती राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने प्रथम क्रमांक पटकावला! मयुरी विजय सोनवणे व सिद्धी प्रमोद खैरनार अनुक्रमे द्वितीय व तृतीय आल्या.
स्पर्धेचे उद्घाटन एम पी पाटील यांनी केले, ए एस बिरारीस यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास यशवंत दाभाडे व मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण एच एम बिरारीस, व्ही एम भोसले व एस पी अहिरराव यांनी केले.
भावस्पर्शी कथा सांगून रसिक व परिक्षकांची दाद मिळविणाऱ्या युवा वक्ता निर्भय धनंजय सोनार याचे प्राचार्य एम एस वाघ, प्रा. डॉ नितीन पाटील, प्रा डॉ संदीप नेरकर, डिगंबर महाले, डॉ जि एम पाटील, प्रा पराग पाटील, प्रा डॉ रमेश माने, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, ऍड सारांश सोनार, प्रा विजय तूंटे, प्रा एस ओ माळी, प्रा अवीत पाटील, प्रा डॉ विजय मांटे, सचिन खंडारे, दिलीप सोनवणे, रमेश पवार, सहाय्यक फौजदार बाळकृष्ण शिंदे, सुवर्णकार समाज व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.