अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनी आनंदाची बातमी मिळणार….
राज्यातील
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह अन्य
मागण्यांवर चर्चा
करण्यासाठी
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुंबई येथे
वर्षा या शासकीय निवासस्थानी शिष्टमंडळाची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या प्रस्तावित मानधनवाढीचा निर्णय तात्काळ घेण्यात येईल तसेच नवीन मोबाईल देण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद लवकर करुन मोबाईल पुरविण्यात येतील. यासोबतच राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची सुमारे वीस हजार रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली असून सदरची पदे भरण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होईल. राज्यातील सेवा समाप्त आणि मृत्यु झालेल्या सुमारे सात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती लाभ देण्याच्या रकमेची शासनाने तरतूद केली असून येत्या दोन ते तिन महिन्यात त्यांना आणि त्यांच्या वारसांना सेवासमाप्ती लाभाची रक्कम अदा करण्यात येईल. कोरोना काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदला अदा करावा यावर आरोग्य आणि महिला व बाल विकास विभाग यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील असेही मा.मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. नागरी तसेच ग्रामिण विभागातील अंगणवाडी केंद्राच्या सुधारित घरभाडे देण्याबाबत फेरविचार करून निर्णय घेतला जाईल असेही सांगितले. अंगणवाडी केंद्राच्या लाभार्थींना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दरात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून त्याबाबत पाठपुरावा केला जाईल. अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचेही
मा.मंत्रीमहोदयांनी बैठकीत आश्वासन दिले. सदर बैठकीत मुख्यमंत्री
मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस,महीला व बालविकास मंत्री
मा.मंगलप्रभात लोढा,अवर सचिव विलास ठाकूर,जहांगीर खान, ए.बा.वि.से.योजनेच्या आयुक्त मा.रूबल
अग्रवाल,उपायुक्त विजय क्षीरसागरसहसंचालक
(वित्त)श्री.लोंढे
यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या
अध्यक्षा-मायाताई परमेश्वर तसेच अन्य प्रतिनिधी सहभागी झाले असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, रामकृष्ण बी.पाटील, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे
यांनी कळविले आहे.