अमळनेर:अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिनानिमित्ताने महिला वारी प्रमुख सौ ज्योती पवार यांच्यासहित महिलांनी गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्यायांचे वाचन सकाळी केले.
महिला वारीमध्ये ज्यांनी सेवा दिली होती अशा गजानन महाराज परीवारातील बंधू,भगिनींचा गजानन सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर.बी पवार यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी महिला वारी सांगता व जागतिक परायण दिनानिमित्ताने स्नेहभोजनाचा कार्यक्रम श्री दिनकर मोतीराम पाटील,श्री कल्पेश दिनकर पाटील,सौ प्रियंका कल्पेश पाटील यांनी केला. संत गजानन महाराज सेवा संस्थानला 1 लाख रूपये देणगी दिली. त्यांचा सर्व परिवारांचा सत्कार अध्यक्ष प्रा. आर बी पवार व ज्योतीताई पवार यांनी केला. यावेळी संत गजानन महाराज महिला परिवारच्या सांगता कार्यक्रमात स्नेहभोजनाचा लाभ गजानन परिवारातील सदस्य व अनेक भाविकांनी मनसोक्त घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गजानन परिवारातील बंधू-भगिनी यांनी प्रयत्न केले.
महीला वारीला मार्गदर्शन गजानन महाराजांचे भक्त मारवड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एल.जे चौधरी यांनी केले तर आभार सर्व गजानन परीवाराचे व महीला वारीत गेलेल्या महीलांचे प्रा. आर बी पवार यांनी मानले.