अमळनेर (योगेश पाने )- महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार 2021 – 22 करिता अंमळनेर तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री हिम्मतराव मुकुंदा पाटील व तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे सचिव भालचंद्र सिताराम खंडेराय यांना नाशिक विभागातून प्रदान करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे मार्फत दिला जाणारा पुरस्कार हा अमळनेर तालुक्याला लाभला असून तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री हिम्मतराव मुकुंदा पाटील व सचिव भालचंद्र सिताराम खंडेराय यांना प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी ग्रामीण रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री माननीय श्री संदिपान भुमरे साहेब यांची उपस्थिती लाभली. पुणे येथील सेवा संघ राज्य अध्यक्ष श्री. एन. डी. मारणे साहेब यांच्या हस्ते श्री क्षेत्र पैठण जिल्हा औरंगाबाद येथे हा पुरस्कार प्रदान करून पुरस्कारार्थीना यथोचित गौरवण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री सदाशिव सोनवणे, चिंधू वानखेडे, मनोहर बाविस्कर, प्रल्हाद सांगोळे, सर्जेराव पाटील, वसंत पाटील, भास्कर पाटील यांनी दोघांवर अभिनंदनचा वर्षाव केला. मित्रपरिवार कुटुंबीय, समाज बांधव यांनी याप्रसंगी आनंद साजरा करून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.