अमळनेर (योगेश पाने) – मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन अमळनेर येथे पत्रकार भवनाच्या नियोजित जागेवर साजरा करण्यात आला. दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1812 ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षांचे होते. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. बाळाशास्त्री जांभेकर यांचे पहिलं मराठी दैनिक 6 जानेवारीला प्रसिद्ध झाल्याने हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. म्हणून ‘मराठी पत्रकार दिनी’ अमळनेर येथे पत्रकार भवनाच्या नियोजित जागेवर पत्रकार दिवस साजरी करण्यात आला . यावेळी अमळनेर तालुका शहर पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोन्ही संघटना एकत्रित आलेल्या होत्या त्याप्रसंगी पत्रकारिता व्यतिरिक्त विविध क्षेत्रात आपला ठसा उमटणारे पत्रकारांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार तसेच अटकाव दिनदर्शिका व लेखन मंच दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला २०२२ मध्ये दिवंगत झालेले पत्रकार बांधव राजेंद्र पोतदार यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार मिळाल्याने संघटना अध्यक्ष चेतन राजपूत सेक्रेटरी चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष जितू ठाकूर यांच्या विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर तालुक्याचे आमदार अनिलदादा पाटील , माजी आमदार स्मिताताई वाघ, माजी आमदार बी. एस. पाटील , तसेच गोकुळ बोरसे, तालुका शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, चिटणीस चंद्रकांत पाटील, पंडीत चौधरी, चंद्रकांत काटे-अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, डिंगबरमहाले सर – विभागीय संघटक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, प्रा. विजय गाढे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. तसेच ग्राम विकास शिक्षण संस्था, मारवड येथील चेअरमन जयवंत मन्साराम पाटील, मनोज पाटील, बी. के. सुर्यवंशी, विक्रांत पाटील, महेंद्र बोरसे, शितल देशमुख, तसेच न.पा. प्रशासक प्रशांत सरोदे, सोबत संजय चौधरी, संदीप गायकवाड त्याचप्रमाणे तालुका कृषि अधिकारी भरत बारे, अशोक पाटील लोण, रणजित शिंदे सर,खा. शि. अध्यक्ष जितेंद्र झाबक, माधुरी पाटील, वसुंधरा लांडगे, शिरीषदादा मित्र परिवारातर्फे प्रवीण पाठक, पंकज चौधरी,अबू महाजन, पांडुरंग महाजन, त्याचप्रमाणे अर्बन बँक संचालक प्रवीण जैन, डॉ. प्रकाश ताडे, भास्कर चोरसे, प्रा. महाजन, संजय पाटील, महेश देशमुख, सुरेश पाटील, प्राचार्य डॉ. एम एस बाघ, प्रा.डॉ.अरुण कोचर आदि असंख्य मान्यवर आलेले होते.