दहिवद दिनांक २८/१२/२०२२ रोजी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला जात आहे आज वृक्ष पाहणीचा कार्यक्रमात महात्मा गांधी रोजगार हमी योजना (बिहार पॅटर्न) अंतर्गत सन २०१८ ते आज पर्यंत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवत आहोत त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतला आहे यापूर्वी २६ जुलै २०१८ रोजी कारगिल दिवसाचे औचित्य साधुन नादब्रम्हाच्या गजरात दहिवद विकास मंचव ग्रामपंचायत दहिवद यांच्या संयुक्त विद्यमानाने १००८ वृक्षांची लागवड केली तसेच ही मोहीम कमी जागेत जास्त वृक्ष लागवड करण्याचा ” मियावकी “जपानच्या पद्धतीत ग्रामनिधीच्या माध्यमातून ७५० वृक्ष लागवड केली ५ ऑगस्ट २०२१ रोजी १३ हजार रुक्ष लागवड करून २२० माता-भगिनींना रोजगार उपलब्ध करून दिला सन २०२२ यावर्षी ७००० वृक्ष लागवड करून १४० माता-भगिनींना रोजगार उपलब्ध करून दिला .सन २०१८ पासून ते सन २०२२ पर्यंत लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिनेशजी पाटील (भारतीय कृषी अनुसंधान परिषद भारत सरकार कृषी मंत्रालय नवी दिल्ली),प्रमुख अतिथी सौ जयश्री अनिल पाटील (माजी जि प सदस्या जिल्हा नियोजन समिती सदस्य जळगाव),सौ विजया मानमोडे (अध्यक्ष खान्देश अहिराणी कस्तुरी मंच महाराष्ट्र),मान्यवर म्हणून सुभाष देसले माजी सभापती पंचायत समिती, अमळनेर प्रवीण काशिनाथ माळी माजी उपसरपंच, जयवंत गुलाबराव पाटील चेअरमन नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद, गीतांजली कोळी अध्यक्ष महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा, सौ. विजया मानमोडे खानदेश अहिराणी कस्तुरी मंच, जितेंद्र बहारे अहिराणी कवी सुरत, ईश्वर गिरधर माळी चेअरमन वि का सोसायटी दहिवद ,दत्तात्रय किसन पाटील व्हा.चेअरमन नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद,गोकुळ गबा माळी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र पांडुरंग पाटील,सामाजिक कार्यकर्ते नाशिक, शिवाजी काशिनाथ माळी उपाध्यक्ष क्षत्रीय काच माळी समाज दहिवद,अनिल साहेबराव माळी मा. उपसरपंच, अनिल भटा माळी शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा दहिवद, संदीप सुभाषचंद्र पाटील शि.वि.धुळे, प्रतिभाताई पाटील पोलीस पाटील दहिवद,पंकज शांताराम पाटील लोकनियुक्त सरपंच निमझरी,अरुण शिरसाठ सरपंच हिंगोणे खुर्द, गणेश पाटील युवा केंद्राध्यक्ष खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य, योगेश शिसोदे डांगरी, शिवाजी नथू पाटील,जिजाबराव माळी शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा,अमळनेर पंचायत समितीचे बागुल नाना, किशोर ठाकरे, किशोर पाटील,धिरज पाटील,सुरेश सोनवणे, कैलास भिल,सचिन पाटील,तुषार माळी तसेच गावातील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यमान सरपंच देवानंद बहारे यांनी केले सूत्रसंचालन टी एस महाजन सर व आलेल्या पाहुण्यांचे व जमलेल्या संपूर्ण मजूर महिलाचें आभार अनिल साहेबराव माळी यांनी मानले .तसेच कार्यक्रमाला साठी उपस्थित कवी विजया मानमोडे,जितू बहारे ,गणेश पाटील यांनी अहिराणी कविता सादर केल्या कार्यक्रमाला अहिराणी कवी संम्मेलनाचे स्वरूप प्राप्त झाले .कार्यक्रमानंतर उपस्थित पाहुण्यांनी व सर्व ग्रामस्थांनी भरीत पोळी (वनभोजन)जेवणाचा आस्वाद घेतला कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य ,सदस्या ग्रा.वि.अधिकारी,ग्रामरोजगार सेवक, कर्मचारी वृंद म गा रो ह योजनेमधील सर्व श्रमिक महिला व पुरुष यांनी परिश्रम घेतले .