अंमळनेर:तालुक्यातील् नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली- रंजाणे विद्यालयात भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली. श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री आर बी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
या प्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ. एम. आर. पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना श्री निवास रामानुजन बद्दल तथ्य सांगताना म्हणाले कि
श्रीनिवास रामानुजन जवळजवळ केवळ स्वतःच शाळेत शिकले. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला कधीच समजून घेतले नाही. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातून आलेल्या रामानुजनने कागदाच्या तुकड्याऐवजी पेन वापरून अंकगणित तपासले. त्यांना शुद्ध गणिताचे कोणतेही औपचारिक शिक्षण मिळाले नाही.
गणिताच्या वेडामुळे, त्याला सरकारी कला महाविद्यालयात जाण्यासाठी आपली शिष्यवृत्ती गमावावी लागली
रामानुजन यांनी कधीही महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले नाही. तरीसुद्धा, त्याने अनेक सुप्रसिद्ध गणितीय प्रमेये तयार केली.
रामानुजन यांनी इंग्लंडमधील जातिवाद प्रत्यक्ष पाहिला होता.
१७२९ हा क्रमांक त्याच्या कर्तृत्वामुळे हार्डी-रामानुजन क्रमांक म्हणून ओळखला जातो.
“रामानुजन का जीवन” नावाचा एक तामिळ चित्रपट त्याच्या जीवनावर आधारित होता आणि २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता.
श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आपण सदैव स्मरणात राहू.अशी माहिती विद्यार्थीना दिली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजय पाटील सर यांनी , भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती निमित्त विद्यालयात निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.तसेच अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इ 10वी विद्यार्थीनी कु. रुपाली सुरेश पारधी हिने भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची प्रतिमा रेखाटन करून विद्यालयास भेट दिली यावेळी शाळेतील शिशक् शिक्षकेतर कर्मचारी व् विध्यार्थी उपस्थित होते.