खांदेश शिक्षण मंडळ संचलित, प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.विजय मांटे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अध्यापकांमधुन अभ्यास मंडळावर निवडून द्यावयाच्या जागेसाठी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत व्यावसायिक अर्थशास्त्र आणि बॅंकीग विषयाच्या अभ्यास मंडळावर पुढील पाच वर्षांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. सध्या कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विविध प्राधिकरणाच्या निवडणुका सुरू आहे आणि दि. ८ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकमेव विद्याशाखा वाणिज्य आणि व्यवस्थापन यामध्ये सर्व अभ्यास मंडळावर सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच प्रा.डॉ. विजय मांटे यांनी अगोदर 1 वर्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून काम केले आहे. प्रा.डॉ. विजय मांटे यांची निवडीबद्दल प्रभारी प्राचार्य, डॉ पी. आर.शिरोडे, सर्व उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच खां. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष, कार्योपाध्यक्ष आणि संचालक मंडळाकडून अभिनंदनाचा वर्षोंव् होत आहे.