प्रसार माध्यमांनी निष्पक्ष शहानिशाह करून बाजू मांडावी.
डीवायएसपी श्री.राकेश जाधव साहेब
अमळनेर येथील लोकतक समाचार मराठी युट्यूब चॅनलचे उद्घाटन अमळनेर उप विभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.
लोकतक समाचार मराठी वेब पोर्टल व युट्यूब चॅनलचे उद्घाटन सोहळा शहरातील ताडेपुरा भागात आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी चनलचा उद्घाटन सोहळा अमळनेर चे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या हस्ते पार पडला, या वेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की,लोकशाही च्या बळकटित प्रसार माध्यमांनी मोलाचा सहभाग नोंदविला आहे.त्यामुळे प्रसार माध्यमांनी निष्पक्ष पणे सत्याची कास धरून बाजू मांडावी.आजू बाजूला घडत असलेल्या वाईट चांगल्या गोष्टी सगळ्या समोर मांडण्याची ताकद फक्त पत्रकारांच्या लेखणी असते.देशाच्या स्वांतत्र्यलढ्यात वृत्तपत्राचा सिंहाचा वाटा होता.आज काल काही प्रमाणात पेड न्यूज दिली जाते,त्या गोष्टी मुळे काही प्रमाणात विश्वासहर्ता कमी होत आहे.या पलीकडे जाऊन सत्याची भूमिका घेतली पाहिजे, असे उदगार त्यांनी काढले.
यावेळी चॅनलला शुभेच्छा देताना प्रोटान या शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष डी ए सोनवणे यांनी प्रसार माध्यमांनी डोळ्यावर पट्टी बांधून पत्रकारिता नकरता उघड्या डोळ्यांनी बाजू मांडावी.असे मत व्यक्त केले.
वरिष्ठ पत्रकार हिरालाल पाटील यांनी सांगितले की पोलिस प्रशासनाला पूरक व गुन्हेगारीला आळा बसेल अश्या आशयाचे लिखाण पत्रकार आपल्या वृत्तपत्रातून करीत असतात.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी लोक तक समाचार मराठी युट्यूब चॅनलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष प्रा विजय गाढे, सामाजिक कार्येकर्ते किरण बहारे,चंदू कनखरे सर, सावखेडा चे माजी सरपंच कोकिळा ताई अहिरे,सेवा निवृत्त अधिकारी रमेश सैदाने,दैनिक आजलगचे संपादक गौतम बिऱ्हाडे,लोक तंत्र चे संपादक समाधान मैराले,दिव्य खान्देश चे संपादक सुरेश कांबळे,नव भारत चे प्रतिनिधी नूर खान,साप्ता अटकाव न्यूजचे संपादक हितेंद्र बडगुजर,संपादक प्रवीण बैसाने, बामसेफचे माजी तालुका अध्यक्ष किरण मोहिते सर आदी सह अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय गाढे यांनी केले तर आभार मिलिंद निकम सर यांनी मानले.चॅनलचे मुख्य संपादक संजय वानखेडे व कार्य संपादक आत्माराम अहिरे यांनी उपस्थितांचे मनापासून आभार मानले.