अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेटीची रक्कम देण्यास विलंब करणाऱ्यांना निलंबित करा अन्यथा जि.प. त घुसून करणार ठिय्या आंदोलन .

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण.बी.पाटील यांनी दिला इशारा..

दिड हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी वेठीस राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना शासनाने दिवाळीपूर्वी भाऊबीज भेटीची रक्कम अदा करावी.या मागणीसाठी संघटनेने मंत्रालय पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला होता.परिणामी शासनाने भाऊबीज भेटीची रक्कम दिवाळीपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणेसाठी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने दि.११ ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रकल्प कार्यालयांना भाऊबीज भेटीची रक्कम वर्ग करण्यात आली. असे असतानाही जिल्ह्यातील पाचोरा,भडगाव, जामनेर-१,धरणगाव,जळगाव (ग्रामीण) या प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रकल्प कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामचुकार आणि हलगर्जीपणामुळे आजतागायत भाऊबीज भेटीची रक्कम मिळाली नाही.त्यामुळे सुमारे दिड हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका वेठीस आहेत. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र राऊत यांच्याकडेही संघटनेने वेळोवेळी याबाबत तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यांनीही आजतागायत ठोस कारवाई केली नाही म्हणून संबंधित तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज आजपर्यंत देण्यात मिळाली नाही. त्यामुळे भाऊबीज भेटीची रक्कम देण्यास विलंब करणाऱ्या वरील प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा अंगणवाडी कर्मचारी सोमवार नंतर कधीही कोणतीही पूर्वसूचना न देता जिल्हा परिषदेमध्ये ठीय्या आंदोलन करतील असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]