
अमळनेर दि. 14 :- जळोद येथील तापी नदी
पात्रात मालखेडा ता.चोपडा येथील एका 42
वर्षीय इसमाने नदीत उडी घेऊन आत्महत्या
केल्याची घटना दि.13 रोजी सकाळी
उघडकीस आली असून अमळनेर पोलिसात
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
आहे.
गणेश दिलीप बाविस्कर वय 42
रा.मालखेडा ता.चोपडा हा इसम मनोरुग्ण
असल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते.
दि.12 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास
घरात कोणास काही एक न सांगता निघून
गेला होता.दि.12 पासून त्याची पत्नी व
कुटुंबातील सदस्य त्याचा शोध घेत
होते.दि.13 रोजी सकाळी जळोद
ता. अमळनेर येथील तापी नदीपात्रावर
बांधलेल्या पुलावर त्याचे चप्पल आढळून
आले.याबाबत शंका आल्याने मासेमारी
करणाऱ्याच्या सहकार्याने नदी पत्रात शोध
घेतला असता त्याचा मृतदेह तापी नदी
पात्रात मिळून आला. त्यास ग्रामीण
रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय
अधिकारी यांनी त्यास मृत घोषित
केले. दिलीप नामदेव बाविस्कर यांनीे
दिलेल्या फिर्यादी वरून अंमळनेर पोलिसात
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.