२७ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२३ च्या दरम्यान महीला पायीवारी निघणार-सौ ज्योती पवार वारीप्रमुख अमळनेर
अमळनेर तालुक्याचे भाविकांचे श्रध्दास्थान जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिर येथून २७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ५ वाजता अमळनेर येथून महिला पायीवारी रविवारी निघणार आहे ..त्या अगोदर सकाळी पाच वाजता महाआरती होईल तरी संत गजानन महाराज परीवारातील बंधू आणि भगिनींनीं उपस्थित राहावे असे महीला पायीवारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी बोलतांना सांगितले.
संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर येथील संस्थेचे अध्यक्ष आर. बी. पवार सर व वारी प्रमुख ज्योती राजेंद्र पवार कळविले आहे की सर्व महिला गजानन भक्तांना कळविण्यात येते की अमळनेरहुन चौथ्यांदा श्रीक्षेत्र शेगाव महिला पायीवारी यावर्षी २७ डिसेंबर २०२२ मंगळवार सकाळी पाच वाजता निघणार. तरी ज्या महिला भक्तांना वारीत यायचे असेल त्यांनी जीएम सोनार नगर येथील मंदिरात नावे नोंदणी करावी किंवा वारी प्रमुखांची संपर्क साधून प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.संत गजानन महाराज परीवारातील भाविकांनी सकाळचा नाश्ता ,दुपारचे जेवण चहा, रात्रीच्या मुक्काम व जेवण याची अनेक सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्यांनी व्यवस्था केली आहे.पाण्याची व्यवस्था राम सोलर, सतीश पाटील भिलाली तर विशेष सहकार्य संत गजानन भजनी मंडळ भिलाली, औषधोपचार डॉ जिजाबराव पाटील, रथाची व्यवस्था आनंद पाटील व रथ व पालखीची सजावट चेतन उपासनी तर अनमोल सहकार्य मातोश्री टेन्ट हाऊस अमळनेर व खंडू मास्तर विलास पाटील सबगव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे .