इंदिराभवन अमळनेर येथे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण संपन्न…!
अमळनेर – तालुक्यातील जवळपास 22 ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या मतदानासाठी आज इंदिराभवन अमळनेर येथे माननीय तहसीलदार श्री मिलिंदकुमार वाघ यांच्या नियोजनाने करण्यात आले. तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्याने उरलेल्या ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या मतदानासाठी इंदिरा भवन येथे माननीय तहसीलदार श्री मिलिंदकुमार वाघ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील बरेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षक बांधवांना कामकाजासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले. या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षकांच्या शंकाचे निरसन माननीय तहसीलदार साहेब यांनी अत्यंत हसत खेळत पद्धतीने केले.
तालुक्याला माननीय श्री मिलिंदकुमार वाघ यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी मिळणे हे अमळनेरकर वासियांसाठी भाग्याचेच लक्षण आहे. या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना अत्यंत विश्वासात घेऊन जबाबदारीने त्यांना दिलेले कार्य पार पाडण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे टेन्शन न घेता आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना दिला.