जयश्री वाडेकर यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जिल्हास्तरीय गुणवंत महिला शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने केले सन्मानित

जयश्री वाडेकर उत्कृष्ट महिला शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित द्रो.रा.कन्याशाळेच्या मुख्य लिपिक जयश्री विजय वाडेकर(भालेराव) यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जिल्हास्तरीय गुणवंत महिला शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने ४ डिसेंम्बर रोजी जळगाव येथे सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ संचलित प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेच्या माध्यमातून जळगाव जिल्हा अधिवेशनात हा सन्मान करण्यात आला.जयश्री विजय वाडेकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य,सामाजिक बांधिलकी जपत राबविलेले सामाजिक उपक्रम यांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव,जिल्हाकार्याध्यक्ष मुबारकशाह फकीर,जिल्हासरचिटणीस मिलिंद निकम तसेच पदाधिकारी उपस्थित होते.जयश्री विजय वाडेकर(भालेराव) यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.. https://chat.whatsapp.com/1bMDU5L8ZsnARXb54lfWDN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *