
थाना – RPF अमलनेर
दिनांक – 05.02.2025
अमळनेर : दिनांक 04.02.2025 रोजी रात्री 11:00 च्या सुमारास मध्य रेल्वेच्या RPF भुसावळ, जळगाव आणि खंडवा ठाण्याचे ASI कुलभूषण सिंह चौहान यांना मोबाईलवर माहिती मिळाली की, खंडवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे सामान चोरीची घटना घडली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे ही चोरी नायडू गँगने केल्याचे स्पष्ट झाले. ही गँग वारंवार कपडे बदलून वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी खंडवा येथे गुन्हा नोंद झाला आहे.
ही गँग चोरी करून पसार होत असल्याची माहिती मिळताच, आरोपी भुसावळ-उधना मेमू एक्सप्रेस (गाडी क्रमांक 19106) ने जात असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत RPF वरिष्ठ निरीक्षक सत्यजित कुमार यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ASI कुलभूषण सिंह चौहान यांनी HC नंदू पाटील आणि CT अर्जुन सिंह यांच्या मदतीने एक टीम तयार केली.
गँगला अमलनेर स्थानकावर अटक
टीमने अमलनेर स्थानकावर संशयित आरोपींना शोधण्यास सुरुवात केली. चार बोगींची तपासणी केल्यानंतर चार संशयित व्यक्ती दिसले. त्यांनी चोरीबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना स्थानकावर ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी RPF पोस्टवर आणले.
आरोपींची ओळख:
तपासादरम्यान आरोपींनी आपली नावे आणि पत्ते पुढीलप्रमाणे सांगितले:
- अविनाश पिता महारनन्ना नायडू (वय 25 वर्षे, रा. वाकीपाडा, मरीमाता मंदिराजवळ, नवापूर, महाराष्ट्र)
- अजय पिता महारनन्ना नायडू (वय 25 वर्षे, रा. वाकीपाडा, मरीमाता मंदिराजवळ, नवापूर, महाराष्ट्र)
- काली पिता कुन्नईया नायडू (वय 29 वर्षे, रा. वाकीपाडा, मरीमाता मंदिराजवळ, नवापूर, महाराष्ट्र)
- राजा पिता आरमबम (वय 33 वर्षे, रा. अमर नगर, एमआर 4 रोड, उज्जैन, मध्यप्रदेश)
चौकशीत त्यांनी नायडू गँगचे सदस्य असल्याचे मान्य केले. ही गँग साधारणतः 8-9 जणांची असून रेल्वे स्थानकांवर आणि शहर परिसरात चोरीचे प्रकार करत असल्याचे समोर आले. खंडवा आणि इतर ठिकाणीही त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
मिळालेला मुद्देमाल:
आरोपींच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता, पुढील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला:
DELL व HP कंपनीचे लॅपटॉप – 2 नग
SAMSUNG Android मोबाईल – 4 नग
VIVO Android मोबाईल – 1 नग
मोबाईल चार्जर – 5 नग
Samsung व Nokia कीपॅड मोबाईल – 2 नग
BELTON कंपनीची घड्याळ – 1 नग
इअरफोन – 1 नग
रोख रक्कम – ₹46,600/-
एकूण मुद्देमालाची किंमत – ₹2,81,200/-
याशिवाय, गँगच्या ताब्यातून 2 धारदार चाकू जप्त करण्यात आले.
गँगची सुपूर्दगी मध्य रेल्वेला
गँगच्या अटकेची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ, जळगाव आणि खंडवा RPF ठाण्यांना देण्यात आली. काही वेळाने भुसावळ विभागाच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक व जळगाव उपनिरीक्षक आपल्या स्टाफसह अमलनेर पोस्टवर पोहोचले. तेथे चारही आरोपींची योग्य तपासणी करून त्यांना अधिक चौकशीसाठी मध्य रेल्वेच्या ताब्यात देण्यात आले.
यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.