रथसप्तमी उत्साहात साजरी – सूर्यनमस्काराचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले

अमळनेर: खा. शि. मं. संचलित गंगाराम सखाराम हायस्कूल, अमळनेर येथे रथसप्तमी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सूर्यदेवतेची पूजा व सूर्य मंत्र पठण करण्यात आले.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. एस. पाटील, उपमुख्याध्यापक श्री. ए. डी. भदाणे, पतंजली योगतज्ञ व योगगुरु श्री. गजानन माळी, जेष्ठ शिक्षक के. पी. पाटील, पर्यवेक्षक श्री. एस. आर. शिंगाणे व श्री. सी. एस. सोनजे, शिक्षक प्रतिनिधी श्री. एस. पी. वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

योगगुरु गजानन माळी सरांनी विद्यार्थ्यांकडून सूर्य मंत्र पठण करून घेत १२ स्टेप्समध्ये सूर्यनमस्कार करून घेतले. त्यानंतर त्यांनी योगासनांचे, सूर्यनमस्काराचे व आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या आजारांवर मात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायामाची गरज त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

मुख्याध्यापक श्री. बी. एस. पाटील यांनीही सूर्यनमस्काराचे शरीरासाठी असलेले महत्त्व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. पी. वाघ यांनी केले, तर श्री. जे. व्ही. बाविस्कर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी श्री. आर. एन. सांळुखे, श्री. एस. आर. अहिरे, श्री. जे. व्ही. बाविस्कर, श्री. उमाकांत हिरे, श्री. एच. एस. चौधरी, श्री. एल. सी. बंजारा यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]