
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025 – जलगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. स्मिता उदय वाघ यांनी मोदी सरकारच्या बजेट 2025-26 चे जोरदार स्वागत केले. त्यांनी या बजेटला मध्यमवर्ग, गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांसाठी क्रांतिकारी आणि प्रगतिशील असल्याचे संबोधले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांच्या कुशल नेतृत्वाखाली देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मध्यमवर्गासाठी मोठा दिलासा
आयकर कपात:
- ₹12 लाख पर्यंत उत्पन्नावर कोणताही कर नाही.
- ₹16 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीस ₹50,000 कर सवलत, तर ₹20 लाख उत्पन्नावर ₹90,000 सवलत.
- ₹50 लाख उत्पन्नावर ₹1.10 लाख सवलत.
नवीन कर श्रेणी:
- ₹4 लाख पर्यंत – कर नाही.
- ₹4-8 लाख – 5%.
- ₹8-12 लाख – 10%.
- ₹12-16 लाख – 15%.
- ₹16-20 लाख – 20%.
- ₹20-24 लाख – 25%.
- ₹24 लाखच्या पुढे – 30%.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत:
- व्याजावरील करमुक्ती ₹50,000 वरून ₹1 लाखपर्यंत वाढवली.
- भाड्यावरील TDS मर्यादा ₹2.4 लाख वरून ₹6 लाखपर्यंत वाढवली.
शेती आणि ग्रामीण विकासासाठी विशेष योजना
- प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना – 100 जिल्ह्यांमध्ये लागू; 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ.
- डाळींच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भरता योजना – तुर, उडीद आणि मसूरवर विशेष लक्ष.
- किसान क्रेडिट कार्ड (KCC) मर्यादा ₹3 लाख वरून ₹5 लाखपर्यंत वाढवली.
- ग्राम समृद्धी आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना – 100 कृषी जिल्ह्यांमध्ये नवीन रोजगार संधी.
महिला आणि युवक सशक्तीकरण
- SC/ST आणि महिलांसाठी स्टार्टअप्ससाठी ₹2 कोटीपर्यंत कर्ज.
- स्वनिधी योजना विस्तार – ₹30,000 पर्यंत क्रेडिट कार्ड महिला उद्योजकांसाठी उपलब्ध.
- 50,000+ अटल टिंकरिंग लॅब्स शासकीय शाळांमध्ये उभारल्या जातील.
- IIT मध्ये 6500+ नवीन प्रवेश क्षमता.
पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास
- ₹1.5 लाख कोटींची 50-वर्षीय व्याजमुक्त कर्ज योजना.
- रेल्वे, महामार्ग आणि शहरी वाहतूक क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक.
- UDAN योजनेचा विस्तार – 120 नवीन गंतव्यस्थळे जोडली जातील.
- MSME साठी क्रेडिट गॅरंटी कव्हर ₹5 कोटी वरून ₹10 कोटी पर्यंत वाढवले.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा
- मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 नवीन जागा, पुढील 5 वर्षांत 75,000 नवीन वैद्यकीय जागा.
- 36 जीवनरक्षक औषधांना कस्टम ड्युटीमधून संपूर्ण सूट.
- कॅन्सर डे-केअर केंद्र प्रत्येक जिल्हा रुग्णालयात स्थापन केले जातील.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ₹500 कोटींचे नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स.
खासदार सौ. स्मिता उदय वाघ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की हे बजेट मध्यमवर्गाला दिलासा देणारे, शेतकऱ्यांना मदत करणारे, महिलांसाठी संधी निर्माण करणारे आणि भारताच्या आत्मनिर्भरतेला बळकटी देणारे आहे. हे विकसित भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.