
अमळनेर : हिंदूहृदयसम्राट व शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज सकाळी १० वाजता शिवसेना कार्यालय, बस स्टँड समोर भागवत रोड येथे अभिवादन प्रतिमा पूजन करण्यात आले. या सोहळ्यात मान्यवरांनी बाळासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे सन्मानपूर्वक पूजन करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांचीही प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये संजय पाटील (शहर प्रमुख), सुरेश पाटील (विधानसभा क्षेत्र प्रमुख), ग्राहक कल्याण फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष हेंमत भांडारकर, मा. नगरसेवक विक्रांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील, महेश पाटील, भुरा पारधी, पिंटू साळुंखे, बाळू पाटील, उदय पाटील, महेंद्र शेटे, नितीन भावसार, टिन्नू घोडेवाले सह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. बाळासाहेबांच्या विचारधारेवर आधारित कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरित केले.