अमळनेर: शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

अमळनेर : शहरातील कोर्ट परिसरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पाडळसरे धरण समितीचे अध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी आणि शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश देशमुख, शहर संघटक साखरलाल महाजन, धर्मवीर सेनेचे बहिरम सर, युवा सेना शहर प्रमुख भरत पवार, उपशहर प्रमुख प्रवीण पाटील, गुणवंत पाटील, समाजसेवक अनंत निकम, आरोग्य सेवक प्रमोद शिंपी, तसेच शिवसैनिक करण जाधव, भैया भाऊ, प्रीतम पाटील, पंकज पाटील, पांडू भाऊ भोई आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची महती सांगत, त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचा संकल्प करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]