
अमळनेर: आज दिनांक 21/01/2025 रोजी मंगळवार, सानेगुरुजी कन्या विद्यालय, अमळनेर येथे एसएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव दादासाहेब श्री संदिपजी घोरपडे यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, संचालक श्री किरण पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभ श्रीमती . अनिता बोरसे, मुख्याध्यापिका यांनी प्रास्ताविक करून केला. आबासाहेब गोकुळ पाटील, केंद्रप्रमुख अमळनेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत परीक्षेच्या तयारीवर आणि पालकांच्या अपेक्षांवर सखोल विचार मांडले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून अभ्यासाची रणनीती ठरवावी आणि अप्रमाने ध्येय निर्धारण करावे.” त्याचबरोबर, विद्यार्थ्यांनी हंगामी अभ्यास टाळून नियमित अभ्यासावर लक्ष केंद्रित करावा.
संस्थेचे सहसचिव नानासाहेब अशोकजी बाविस्कर यांनी संस्थेच्या उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. दादासाहेब संदीपजी घोरपडे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या ‘कॉफी मुक्त अभियान’ तसेच समाजासाठी केलेल्या कार्यांची महत्त्वपूर्ण माहिती दिली.
समाजकार्याची महत्ता पटवून देत श्री मनोजजी शिंगांणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप श्री मुकेश अमृत पाटील यांनी सूत्रसंचालन करून केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.