
अमळनेर: तालुक्यातील खड़के येथील दाम्पत्यासोबत भीषण अपघाताची घटना घडली आहे. अमळनेर-धुळे मार्गावरील मंगरुळ येथील सेंट मेरी इंग्लिश मेडियम स्कूलजवळ एस.टी. बस (क्रमांक MH 13 CU 6930) आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात अरुणा समाधान पाटील (वय 51) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचे पती समाधान रुपसिंह पाटील गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समाधान पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या अपघाताबाबत पोलिस प्रशासनाने तपास सुरू केला असून, अपघाताचे कारण आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.