बडगुजर समाज पंचमंडळ अमळनेर तर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

अमळनेर:  दि. 19 जानेवारी 2024, रविवार रोजी बडगुजर समाज पंचमंडळ, अमळनेर यांच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे मंत्रमुग्ध सूत्रसंचालन सौं. रोहिणीताई दिनेशशेठ बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक उखाण्यांनी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माननीय श्रीमती मंगलाताई भास्करशेठ गिरनार यांनी भूषवली. यावेळी व्यासपीठावर सौ. स्वप्नाताई विक्रांत पाटील (भावी नगरसेविका), सौं. वसुंधराताई दशरथ लांडगे, सौं. रिताताई चंदूलालशेठ बडगुजर, सौ. क्रांतीताई सतीशशेठ बडगुजर, श्रीमती वैशालीताई माधवराव बडगुजर, सौं. कल्पनाताई किशोरशेठ बडगुजर आणि सौं. कल्याणी शुभम बडगुजर उपस्थित होते.

कार्यक्रमात हळदी-कुंकू समारंभासोबतच नवरात्र उत्सवातील विविध स्पर्धांचे विजेते महिला आणि बालगोपालांना बक्षिसे वितरित करण्यात आली. सौं. वसुंधराताई लांडगे यांनी विधवा आणि परित्यक्त्या महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मंडळाचे आभार मानले.

यावेळी सौं. स्वप्नाताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सचिव श्री. घन:श्याम रमेशशेठ मांडळकर यांनी समाजातील महिलांनी पंचमंडळाचे सभासद होण्याचे महत्व स्पष्ट केले आणि बचत गट स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले. महिलांनी या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौं. सुनंदा कैलास बडगुजर, सौं. रंजनाताई नरेंद्र बडगुजर, सौं. स्वाती रवींद्र बडगुजर, सौं. वैशाली ललित बडगुजर, सौं. मिनल गिरीष बडगुजर, सौ. कविता विजय बडगुजर, सौं. रुपाली विनोद बडगुजर, सौं. देवयानी प्रमोद बडगुजर, सौ. क्रांती सतीश बडगुजर, सौ. रश्मी घनश्याम मांडळकर, सौ. निलम भूषण बडगुजर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना हळदी-कुंकूचे वाण देण्यात आले आणि अल्पोपहाराने समारोप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]