जलजीवन मिशन योजनेचे काम अपूर्ण असताना 92,79,214/- रुपयांचे बिल अदा, अफरातफरचा आरोप

ग्रामस्थांची दोषीवर कठोर कारवाईची मागणी

अन्यथा 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा उपोषणास बसण्याच्या इशारा

अमळनेर :तालुक्यातील शिरूड तालुका अमळनेर येथील जलजीवन मिशन योजना सन 2021 योजनेच्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या कामात गंभीर अफरातफर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. योजनेचे काम पूर्ण होण्याआधीच 92,79,214/- रुपयांचे बिल मंजूर करून ते अदा करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, योजनेचे काम अद्याप अपूर्ण असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच कायम आहे. मात्र संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने गैरव्यवहार करत हे पैसे उचलले आहेत.

ग्रामस्थांनी शासनाकडे याबाबत सखोल चौकशीची मागणी करत दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण असून, जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनेचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले आहे.

गावातील नागरिकांनी या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, आता प्रशासनाकडून कारवाई होण्याची अपेक्षा आहे.

महोदय सदर पाणी पुरवठा” योजनेचे मार्च, एप्रिल, मे जून सन २०२५ मधील उन्हाळ्याची दखल घेवुन योग्य ती चौकशी करावी अन्यथा गावकऱ्यांना सदर योजनेचा कोणताही उपभोग घेता आला नाही. म्हणून शासनाच्या अधिकारी वर्गाच्या व ठेकेदाराच्या धोरणाविरोधात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे मूहुर्त साधुन राष्ट्रीय कार्यक्रम ध्वजारोहण समारंभ आटोपताच दि. २६ /१/२०२५ रोजी सकाजी दिक ९.३० वाजता गटविकास अधिकारी पंचायत समिती, अमळनेर येथे साखळी
उपोषणास बसणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ अलकाबाई शशिकांत बी अकबर खाटीक चंद्रकला विनायक पाटील दिलीप रतन पाटील अमीन अकबर खाटीक शशिकांत आर पाटील यांनी  दिला आहे.

तरी माहितीस्तव निवेदनाची प्रत माननीय जिल्हाधिकारी व जळगाव माननीय तहसीलदार अमळनेर माननीय कार्यकारी अभियंता ग्रामपंचायत पुरवठा विभाग जिल्हा परिषद जळगाव माननीय उपविभाग अभियंता असो ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना उपविभाग अमळनेर माननीय प्रधान सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय माननीय आमदार दादासो अनिल भाईदास पाटील माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य सचिवालय मुंबई यांना रवाना करण्यात आलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]