
अमळनेर : दि अमळनेर को. ऑप.अर्बन बँकेचे शतक महोत्सवी वर्षात पदार्पण होतानाअर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून सदर नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रथमच बँकेने काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व पू संत श्री सखाराम महाराज यांच्या शुभहस्ते आणि खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत १७ जानेवारी सायंकाळी ५ वा. होणार आहे
अमळनेर को ऑफ अर्बन बँकेचे आधुनिक बँकिंग सुविधांनी संपन्न असे सभासद व ग्राहकाभिमुख अद्ययावत मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण नुकतेच केले आहे.सदर नूतन कार्यालयाचे उद्घाटन तसेच
अमळनेर अर्बन बँकेने प्रथमच सभासद, ग्राहकांना बँकिंगची सहज सुलभ माहिती देणारी दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन प .पु.संत श्री.सखाराम महाराज यांच्या शुभहस्ते आणि खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत
अर्बन बँकेचे सर्व सन्माननीय आजी व माजी संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद ,पिग्मी एजेंट यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे असे चेअरमन पंकज गोविंद मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित बी.शिंदे तसेच बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील
यांचे तर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.