अमळनेर येथे भव्य खुली तालुका स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन..

स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन..

अमळनेर : येथे ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विश्वशांती बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे भव्य तालुकास्तरीय खुली सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे ,अमळनेर येथे महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक आणि भारतीय संविधान या विषयांवर तालुकास्तरीय खुली सामान्य स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे,या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी सहभाग घ्यावा अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिनांक १९ जानेवारी रविवार रोजी साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर या ठिकाणी होणार असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक करण्यात आले आहे, त्यासाठी अंतिम दिनांक १७ जानेवारी निर्धारित करण्यात आला आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमळनेर येथील संकल्प अकॅडमी अड.खैरनार सर संपर्क – 8459263252 तसेच सक्सेस अकॅडमी अड.लोहार सर संपर्क -9765956504 यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्यांसाठी 5000/- व संविधानाची प्रत, द्वितीय क्रमांक साठी 3000/- व संविधानाची प्रत, तृतीय 2000/- व संविधानाची प्रत तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार असून व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहे.
तरी स्पर्धकांनी लवकरात लवकर संपर्क करून नाव नोंदणी करून घ्यावी अशी विनंती विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रविण बैसाणे यांनी केली आहे.तसेच अधिक माहिती साठी मो.9145442324 यावर संपर्क साधावा ही विनंती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]