
अमळनेर: जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त “सन्मान नारी शक्तिचा” या कार्यक्रमातंर्गत ग्रामपंचायत लोण द्वारा आयोजित महीला सभा उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शशिकांत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून कृपा सभापती अशोक पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले. लोकशाही शासन प्रणालीत अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असुन गावातील ग्रामस्थांनी अधिकाराच्या मागणीबरोबर नियमित करभरणा,वेळेवर जन्म- मृत्य-विवाह नोंद, सार्वजनिक व परीसर स्वच्छता इत्यादीं कर्तव्या बाबत जाणीव असू द्यावी असे मत अध्यक्षीय भाषणात लोणखुर्द येथील सरपंच डॉ. शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले.
प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना महीला सक्षमीकरणासाठी लोणखुर्द ग्रामपंचायतीने राबविलेला सदर उपक्रम हा परिसरातील ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करणारा असुन माझ गाव माझा अभिमान या नात्याने महीला समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.
१२ जानेवारी निमित्त अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द ग्रामपंचायत द्वारा आयोजित महीला सभेत ‘सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमातंर्गत’ गावातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी ताई खटाबाई पाटील, जनाबाई पाटील, रमणबाई पाटील, जि. प. शिक्षिका सुरेखा पाटील, ज्योतिबाला बच्छाव, माध्य शिक्षिका प्रतिभा जाधव, संगीता पाटील, पो. पाटील तनूजा पाटील, ग्रा. पं. सदस्य निलाबाई पाटील, ललिता पाटील, प्रतिभा पाटील, सुमनताई भील, उपसरपंच मीनाताई भील, आशाताई अश्विनी भील आणि मदतनीस कविता पाटील अशा १४ माताभगिनींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना स्नेहवस्त्र, भारतीय संविधान प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुणे म् सभापती अशोक पाटील, सरपंच शशिकांत पाटील व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गावातील तरूणी व महिलांनी यापासून प्रेरित होऊन गावपातळीवर राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक अभिनव उपक्रमात महीलांचा कृतिशील सहभाग वाढविणे हा सदर कार्यक्रमामागील हेतू होता. गावातील महिला समस्यांचा वेध घेऊन आर्थिक वर्ष २०२५ -२६ मधील कृती आराखडय़ात त्या संबंधी विशेष तरतूद करण्यासाठी सभेतून महिलांनी विचारमंथन केले.
सूत्रसंचालन निरंक पाटील यांनी तर आभार हिमानी पाटील यांनी मांडलेत. ग्रा. पं. शिपाई भिकन पाटील, संगणक परीचालक अशोक पाटील, भगवान पाटील, संतोष पाटील, समाधान पाटील यांनी परीश्रम घेतले. सभेस गावातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.